अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी

संपूर्ण भारत देशात विविध मंगल कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी,दि.१७ जानेवारी
अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापने दिवशी म्हणजेच सोमवार दि.२२ जानेवारी रोजी संपूर्ण भारत देशात विविध मंगल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आपल्या सावंतवाडी शहरातही श्रीराम जन्मभूमी उत्सव समिती सावंतवाडी च्या वतीने या दिवशी मोती तलावा सभोवती दीपोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे.रात्रौ ८ वाजता मोती तलावाच्या काठावर पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.तसेच यावेळी श्रीरामरक्षा पठण व ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचे नामस्मरण ही होणार आहे.
समितीच्या वतीने मोती तलावाला आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे.
वातावरण निर्मिती म्हणून शनिवार दि.२० जानेवारी रोजी सायं.५.३० वाजता शहरात भव्य बाईक रँलीचे आयोजन ही करण्यात आले आहे.ही रँली राजवाडा येथून सुरु होवून शहरात फिरुन श्री नारायण मंदिर येथे रँलीची सांगता होणार आहे.
सर्व श्रीरामभक्त नागरिकांनी बहुसंख्येने रँली मध्ये सहभागी व्हावे.तसेच दिपोत्सवासाठी स्वत:च तेलाच्या पणत्या आणून त्या प्रज्वलित करुन दिपोत्सव ही यशस्वी करावा असे आवाहन करण्यात येत आहे…