मळगाव येथे २८ रोजी ‘श्री गणेश हनुमान युद्ध’

बांदा,दि.२४ एप्रिल

श्री देव इसवटी प्रासादिक मंडळ, मळगाव रेडकरवाडी येथे रविवार २८ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त रात्री ९ वा. पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला यांचा ‘श्री गणेश हनुमान युद्ध’ हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.