मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत मराठी भाषा विभागातर्फे तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर

देवगड,दि.१७ जानेवारी

श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत मराठी भाषा विभागातर्फे तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही कथाकथन स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री सागर कर्णिक सर, शेठ म. ग. हायस्कूल, देवगड व प्राध्यापिका पूजा नारिंग्रेकर मॅडम, श्रीमती. न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड, हे उपस्थित होते. या स्पर्धेचे नियोजन मराठी विभाग प्रमुख यांनी केले. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

पाचवी ते आठवी गट

* प्रथम पारितोषिक – कु. दिया संदीप साटम. – उमा मिलिंद पवार हायस्कूल देवगड.

* द्वितीय पारितोषिक – कु. राज्ञी विवेक कुळकर्णी, शेठ म.ग. हायस्कूल देवगड.

*तृतीय पारितोषिक – कु. स्वालिहा रफिक नायकवडे. अ. कृ. केळकर हायस्कूल वाडा.

नववी ते बारावी गट

* प्रथम पारितोषिक – कु. श्रुती विलास गावडे, श्रीमती न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड.

* द्वितीय पारितोषिक – कु. अंजली प्रविंद कावले, शेठ म.ग. हायस्कूल देवगड.

* तृतीय पारितोषिक – कु. तन्वी विजय गोठणकर, आय.इ.एस. माध्यमिक विद्यालय विजयदुर्ग.

पदवी व पदव्युत्तर गट

* प्रथम पारितोषिक – कु. नुपूर मकरंद लळीत, श्री. स.ह. केळकर वरिष्ठ महाविद्यालय देवगड.

* द्वितीय पारितोषिक – कु. वैभवी सतीश परब, श्री. स.ह. केळकर वरिष्ठ महाविद्यालय देवगड.

* तृतीय पारितोषिक – कु. श्रीश दीपक वाळके, श्री. स.ह. केळकर वरिष्ठ महाविद्यालय देवगड.

स्पर्धकांना रोख रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन कु. आयुष सावंत यांनी केले व आभार कु. श्रीश वाळके यांनी मानले.