वेंगुर्ला, दि.२३ एप्रिल
मूळचे वेंगुर्ला-राऊळवाडा येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले शामलाल रघुवीर खानोलकर यांनी आपली पत्नी सौ.सुचेता शामलाल खानोलकर यांच्या स्मरणार्थ ५ हजार रूपयांची देणगी नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेस दिली आहे. त्यांच्या या देणगीबद्दल कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी आभार व्यक्त केले.