सावंतवाडी, दि.२३ एप्रिल
ठाकरे शिवसेनेचे लोकसभा उमेदवार खासदार विनायक राऊत यांचे येथील बाहेरचावाडा परिसरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी राऊत यांच्या पाठिशी येथील युवा संघटना राहणार आहे, असा विश्वास यावेळी उपस्थित युवकांनी व्यक्त केला.
यावेळी हंजला नाईक, आफताब मेमन, कृपेश राठोड, बासित पडवेकर, मझीम बेग, फारूख मणियार, मोईझ मुल्ला, इरफान शेख आदी युवक उपस्थित होते.
सावंतवाडी गाठीभेटी दौऱ्यावर असलेल्या श्री. राऊत यांनी काल मंगळवारी रात्री उशिरा येथील बाहेरचावाडा भागात भेट दिली. यावेळी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला मताधिक्य द्या, असे आवाहन उपस्थित युवा वर्गाला केले. यावेळी काही झाले तर आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे आश्वासन उपस्थित युवाई कडून देण्यात आले.