कणकवलीत ५ व्हिडिओ गेम पार्लर पोलिसांची धडक कारवाई

कारवाईत रोख ४० हजार, ४४ मशीन ,मोबाईल जप्त ;१२ जणांना घेतले ताब्यात..

कणकवली दि.१७ जानेवारी(भगवान लोके)

कणकवली शहरामध्ये ५ व्हिडिओ गेम पार्लर पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यामध्ये तब्बल ४४ मशीन कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच हे व्हिडिओ गेम पार्लर चालक व त्यांचे कर्मचारी व दोन खेळणारे असे मिळून १२ जणांना ताब्यात घेतले आहेत.

कणकवली शहरांमध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत व्हिडिओ गेम पार्लर ही कारवाई आली आहे.
कणकवली तालुक्यातील ही मोठी कारवाई आहे. या कारवाईत रोख ४० हजार, ४४ मशीन ,मोबाईल जप्त करण्यात आले असून सुमारे २ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, पोलीस उपनिरीक्षक शेगडे, पोलीस नाईक रुपेश गुरव, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, सुशांत कोलते, सागर जाधव, रणजीत दबडे, राज आगाव, रघुनाथ जांभळे, विनोद चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.