अडीच वर्षात दोन वेळा मंत्र्यालयात जात उद्धव ठाकरेंनी वर्ल्ड रेकॉर्ड केला-मंत्री केसरकर

सावंतवाडी दि.२५ एप्रिल
मुद्दाम पावसात भिजायला काही अर्थ नसतो. त्यामुळे विनाकारण आजारी पडायला होतं, उगाच अंधश्रद्धा पसरविण्यात येत आहे,अशी टीका उद्धव ठाकरेंच्या पावसातील सभेवर केली.
तर विनायक राऊत प्रतिमुख्यमंत्री म्हणून वावरत होते. तर अडीच वर्षात दोन वेळा मंत्र्यालयात जात उद्धव ठाकरेंनी वर्ल्ड रेकॉर्ड केला. उद्धव ठाकरेंनी राहूल गांधींना मिठी मारल्यान धनुष्यबाण आमच्याकडे आला. मी साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आलो आहे. धडाधड काम सुरु झाली आहेत. शुक्रवारपासून राणेंना विजयी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे असे केसरकर यांनी सांगितले.

लोकांच्या अनेक समस्या असतात‌. काही दिवसांत आम्ही ते सोडवू शकतो. ते प्रश्न आमच्यापर्यंत पोहचण्यासाठी एक लोकनेता ऍप सिस्टीम डेव्हलप केली असून थेट माझ्या कार्यालयातून जनतेच्या कामांचा पाठपुरावा घेतला जाईल. समोरच्या माणसाला देखील आपल्या कामाची माहीती मोबाईलवर मिळेल‌. लोकनेता नावाच रजिस्ट्रेशन झालं असून त्याची पहिली सुरूवात सावंतवाडीतून होणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येकाचा डायरेक्ट कनेक्ट माझ्या कार्यालयाशी होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात न्याय लोकांना मिळणार आहे.‌लोकांच्या प्रेमातून उतराई होण्याची संधी मला मिळणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना माझ्यापेक्षा अधिक मत देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी शेवटचे तीन दीवस राणेंसोबत जाहीर सभा घेणार आहे. माझ्या मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते येत आहेत. त्यांना लोकांची ताकद दाखवून द्यायची आहे. महालातून राज्य चालवण्याची सवय उबाठाच्या लोकांना आहे, असे त्यांनी सांगितले. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राजघराण्याकडून जमीन देण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठराव झाला आहे. न्यायालयीनबाबीमुळे थोडा वेळ लागला ही वस्तुस्थिती आहे. परंतु, हॉस्पिटल लगत मल्टिस्पेशालीटी असल्यास त्याचा फायदा रूग्णांना होतो. २०० बेडच हॉस्पिटल या ठिकाणी तयार होऊन अधिकचे डॉक्टरही उपलब्ध असतात. सावंतवाडीच मल्टिस्पेशालीटी आदर्शवत असेल. काम सगळी मीच मंजूर केली. खासदार विनायक राऊत यांनी आयुष्यात काही केलं नाही. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देखील निधी मीच मंजूर करून दिले. त्यामुळे विनायक राऊत यांनी अधिक काळजी करू नये. ते पुढे खासदार नसले तरी त्यांनी ऐकलेल्या घोषणा आम्ही पूर्ण करू, त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. ते पुढे खासदार नसले व एखादं काम घेऊन आले तर नक्की ते करू असे केसरकर यांनी सांगितले.