देवगडात शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांची जाहीर प्रचार सभा

युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांची पत्रकार परिषद

देवगड,दि.२५ एप्रिल
महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार खास.विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन शनिवार दि.२७ एप्रिल रोजी पडेल येथे सायं ४ वा. व देवगड या ठिकाणी सायं.६.३० वा. करण्यात आले असून तत्पूर्वी मशाल रॅलीचे आयोजन जामसंडे ते देवगड या मार्गावर काढण्यात येणार आहेत.अशी माहिती युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर ,तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष उमेश कुळकर्णी, तुषार भाबल उपस्थित होते.
या जाहीर सभेला जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आम.वैभव नाईक ,जिल्हाप्रमुख संदेश पारकर,यावेळी सुशांत नाईक सतीश सावंत,अतुल रावराणे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ,राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हा प्रमुख,युवक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व महाविकास इंडिया आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.