भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती
रत्नागिरी दि.२५ एप्रिल(भगवान लोके)
-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार ना.नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी राजापूर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे.
शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता राजीव गांधी मैदान राजापूर येथे ही प्रचारसभा होणार आहे.यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, ना.दीपक केसरकर, ना. उदयजी सामंत, आ. नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, आ. शेखर निकम, प्रमोद जठार, बाळ माने, यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.
महायुतीच्या सर्व सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी कोकणच्या मतदारांसमवेत उपस्थित रहावे.