शहरातील फर्निचरचे मालक अशोक देसाई यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सावंतवाडी दि.२५ एप्रिल
येथील सुषमा एंटरप्रायझेस (फर्निचर ) चे मालक व लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष अशोक देसाई (५९ ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते मुळ डेगवे गावचे सुपुत्र असून सावंतवाडी मध्ये व्यवसायानिमित्त सर्वोदय नगर येथे वास्त्तव्यास होते.
लायन्स क्लबच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत होते तसेच डि के टुरिझम या पर्यटन संस्थेचे संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,पाच भाऊ, एक बहीणी व बांदा येथील व्यापारी अभय, जयवंत, अनिल,अजय देसाई यांचे ते भाऊ होत. डेगवे येथे उद्या शुक्रवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अशोक देसाई दुपारी घरी असताना अचानक उलटी झाली आणि हृदयविकाआचा तीव्र झटका आला. त्यानंतर रूग्णालयात नेण्यात आले पण त्यांचे निधन झाले होते. यानंतर सालईवाडा परिसरातील दुकाने बंद ठेवून श्रध्दांजली वाहण्यात आली.