गटार केले बंद बांधकाम विभाग नगरपंचायत याना ठेवले अंधारात
दोडामार्ग, दि. २५ एप्रिल
साळ गोवा हद्दीत दोडामार्ग बांदा मुख्य रस्त्याला लागून गोवा येथील बिल्डरने जमीन साफसफाई करून पोल्टींग सुरू केले आहे. या ठिकाणी जेसीबी मशीन लावून साफसफाई करून रस्ते काढले जात असताना गोवा महाराष्ट्र हद्दीत रस्ता जोडण्यासाठी बेकायदेशीर माती भराव टाकून घुसखोरी करून पाणी वाहणारे गटार बंद केले. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरपंचायत याना अंधारात ठेवले आहे. काही जणांनी ही घटना नगरपंचायत कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून दिली या नंतर मठकर यांनी पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते योगेश महाले, आनंद रेडकर देखील उपस्थित होते.
तिलारी धरणग्रस्त यांचे पुनर्वसन केलेल्या साळ गोवा दोडामार्ग हद्दीला लागून कुणी बिल्डर यांनी जमीन खरेदी करून या ठिकाणी प्लानिंग सुरू केले आहे. या ठिकाणी येण्यासाठी महाराष्ट्र हद्दीतून रस्ता आहे. हे दाखवण्यासाठी महाराष्ट्र हद्दीत बेकायदेशीर घुसखोरी केली आहे. गेल्या तीस वर्षांपासून साळ गोवा येथील धरणग्रस्त रस्ता मागत आहेत तर रस्ता मिळत नाही. संबंधित अधिकारी कमी पडले आहे. असे असताना बिल्डर लाॅबी यांनी चक्क महाराष्ट्र हद्दीत रस्ता तयार करण्यासाठी माती भराव टाकला तीस फूट महाराष्ट्र हद्दीत घुसखोरी केली आहे.
गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी दोडामार्ग ते बांदा रस्ता आहे. याला लागून असलेले गटार बंद केले आहे. महाराष्ट्र हद्दीत घुसखोरी करून जबरदस्तीने बेकायदेशीर रस्ता काढण्याचा एक डाव आहे. कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत तसेच बांधकाम विभाग कडून किंवा दोन्ही हद्दीतील शासकीय मामलेदार यांची परवानगी घेतलेली नाही. प्लाटिंग करून येते येण्यासाठी महाराष्ट्र हद्दीतून रस्ता आहे हे दाखवण्यासाठी ही घुसखोरी केली आहे. या संपूर्ण प्रकरणांची दोडामार्ग तहसीलदार बांधकाम विभाग नगरपंचायत मुख्य अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.