मालवण,दि.१७ जानेवारी
रोटरी क्लब मालवण आणि आय. एम. ए. मालवण यांच्या सहकार्याने मालवण येथील लिमये हॉस्पिटल येथे एसटी आगार कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा ३७ एसटी चालक, वाहक तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उदघाटन डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये शारीरिक तपासणी तसेच रक्ततपासणी व डायबेटिक रुग्णांच्या पायाच्या विशेष तपासण्या करून त्या रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. अजित लिमये, डॉ. मालविका झाटये, डॉ. प्रशांत पवार, डॉ. लीना लिमये, एसटी चे कर्मचारी तसेच रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष अभय कदम, सेक्रेटरी संदेश पवार, रंजन तांबे उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी लिमये हॉस्पिटलचे कर्मचारी स्टाफ व हिंद लॅबचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.