सावंतवाडी,दि.१७ जानेवारी
भारतीय जनता पार्टीची सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चा विस्तारित कार्यकारणी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ श्वेता कोरगावकर यांनी जाहीर केली जिल्ह्यातील सक्षम महिला पदाधिकाऱ्यांना या कार्यकारणीतून न्याय देण्यात आला असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा बघण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्याचा 50 टक्के वाटा महिला मोर्चाच्या माध्यमातून उचलणारा असा दावा यावेळी सौ कोरगावकर यांनी व्यक्त केला.
सौ करगावकर यांनी आज येथील भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेत कार्यकारणी जाहीर केली यावेळी त्यांच्यासोबत बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी, महिला मोर्चा
जिल्हा उपाध्यक्ष रेखा काणेकर, जिल्हा सरचिटणीस शर्वांणी गावकर, अदिती सावंत,सावंतवाडी शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, जिल्हा मोर्चा चिटणीस मिसबा शेख, माझी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, मुक्ती परब आदी उपस्थित होत्या.
सौ कोरगावकर म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी राबवलेल्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचले आहेत यामध्ये उज्वला गॅस योजना समृद्धी योजना जलजीवन मिशन आदी योजनांचा लाभ सहजरित्या महिलांना मिळाला आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी महिला मोर्चाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग मध्ये एकनिष्ठतेने काम करून पुरुषांच्या बरोबरीने 50 टक्के मताधिक्यांचा वाटा आम्ही उचलणार आहोत एकूणच यासाठी नव्याने विस्तारित कार्यकारणीमध्ये जिल्ह्यातील सक्षम महिलांना न्याय देण्यात आला आहे आदरणीय महिला परिषद अध्यक्ष चित्रा वाघ केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारणी निवडण्यात आली आहे.
विस्तारित कार्यकरणी पुढीलप्रमाणे – महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर जिल्हा उपाध्यक्ष सावी लोके रेखा काणेकर वृंदा गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस पुजा जाधव, शर्वांणी गावकर, अदिती सावंत, जिल्हा चिटणीस मिसबा शेख, कल्पना बुडकुले, हर्षदा हरयान, पूजा सरकारे, मनस्वी घारे, रत्नप्रभा वळंजु,
मंडल अध्यक्ष मध्ये उषकला केळुस्कर देवगड, संजना आळवे पडेल, प्राची तावडे वैभववाडी, हर्षदा वाळके कणकवली शहर,आरती पाटील कुडाळ, सुप्रिया वालावलकर ओरस, प्राजक्ता केळुसकर आंबोली, रूपाली शिरसाट बांदा, मोहिनी मडगावकर सावंतवाडी शहर,पूजा करलकर मालवण शहर,अन्वेषा आचरेकर मालवण ग्रामीण, दीक्षा महालकर दोडामार्ग, सुजाता पडवळ वेंगुर्ला, महिला मोर्चा जिल्हा सदस्य पदी मनाली होनाळे, राजश्री पवार मीनल पवार स्नेहा सावंत अंजली कदम प्रिया कंडरकर, दिपाली भालेकर सुप्रिया मडगावकर सुजाता मणेकर, रेश्मा कोरगावकर अनघा देवरुखकर माधुरी बांदेकर सुप्रिया नलावडे प्राजक्ता शिरवलकर तन्वी चांदोसकर प्राजक्ता घाडी संध्या काळी प्रसादी सारिका काळसेकर वंदना किनळेकर त्यांची निवड करण्यात आली तर निमंत्रित सदस्य पदी स्मिता आठलेकर, रेश्मा सावंत, संजना सावंत, समिधा नाईक,शिल्पा मराठे, आम्रपाली साळवे यांची निवड करण्यात आली आहे.