तळकट कोलझर गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम धिम्या गतीने

पावसाळ्यात रस्ता बंद होण्याची भीती ग्रामस्थांनी वेधले दिपक केसरकर यांचे लक्ष

दोडामार्ग, दि. २६ एप्रिल

पंतप्रधान ग्राम सडक योजना मधून कोट्यवधी रुपये खर्च करून तळकट कोलझर गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू होऊन महिना उलटला तरी या ठिकाणी धिम्या गतीने काम सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुलाचे काम पूर्ण होईल याची शाश्वती नाही. रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गावातील ग्रामस्थ यांनी सावंतवाडी येथे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन या पुलाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी ठेकेदार याना सूचना कराव्यात अशी मागणी केली आहे.