सावंतवाडी दि.२६ एप्रिल
सोनुर्ली गावठाणवाडी येथील महादेव जगन्नाथ गावकर (५८) रेल्वेच्या धडकेत सकाळी ठार झाले. सोनुर्ली ओलेतळे येथून जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर त्यांचा मृतदेह आढळला. यावेळी एक म्हैस मृत्यूमुखी पडलेली आढळून आली. रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले.
सोनुर्ली गावठण वाडी येथील महादेव जगन्नाथ गावकर सकाळी आपल्या गुरांना (म्हैसी) चारण्यासाठी गेले होते ते गेलेल्या जवळपास ठिकाणाहून कोकण रेल्वे धावते. या ठिकाणी म्हैस रुळाच्या मार्गावर गेली असावी आणि तेथून ते तिला परतण्याच्या नादामध्ये रेल्वेने धडक दिली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
रेल्वेच्या धडकेत महादेव गावकर यांच्यासह त्यांची म्हैस देखील मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले आहे. या अपघातामुळे सोनुर्ली मधील सर्वच घटनास्थळी पोहोचले. या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महादेव गावकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व विवाहित मुलगी असा परिवार आहे.