मोर्ले गावात जंगली हत्ती कडून महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न

 हल्ला केला समजून भावजय पडली बेशुद्ध जंगली हत्ती आक्रमक झाले असताना वन विभाग गाफील सायंकाळची घटना गावात भितीचे वातावरण

दोडामार्ग, दि. २६ एप्रिल

मोर्ले गावात धुमाकूळ घालत असलेल्या जंगली हत्ती कडून दहशत निर्माण केली जात आहे. दिवसाढवळ्या राञी हत्ती संचार सुरू आहे यामुळे एकट्या दुकट्याने बाहेर पडणे कठीण झाले आहे यात हत्ती आक्रमक होताना दिसत आहे. पण वन विभाग कडून दखल घेतली जात नाही. सरकार देखील अपयशी ठरले आहे. मोर्ले गावात शुक्रवारी सायंकाळी काजू बागेतून घरी येणाऱ्या महिलेवर हत्तींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला यात भाग्यश्री भगवान गवस ही खाली पडली भावजवर हल्ला केला या भितीने पल्लवी गवस ही महिला बेशुद्ध पडली तिला अखेर वन विभाग यांच्या वाहनातून राञी साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे दाखल केले. अशी माहिती माजी सरपंच गोपाळ गवस यांनी दिली.