गावस्तरावर पाणी गुणवत्ता तपासणीसाठी महिलांचा सहभाग ठरणार महत्त्वाचा गटविकास अधिकारी देवगड श्रीम .वृक्षाली यादव

देवगड,दि.२७ एप्रिल
देवगडमध्ये महिलांच्या माध्यमातुन दिनांक २५ रोजी एकाच दिवशी अणुजैविक फिल्ड टेस्ट किट् द्वारे करण्यात आले सार्वजनिक स्रोतांचे पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात आली
आरोग्यावर परिणाम करणारा पहिला घटक असणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर शासनाने जलजीवन मिशनद्वारे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या मोहिमेत ग्रामीण जनतेस शुद्ध व सुरक्षित पाणी पुरविण्यासाठी अणु जैविक फिल्ड टेस्ट किट’द्वारे स्थानिक नागरिकांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. या प्रयोगांतर्गत देवगड तालुक्यातील प्रत्येक ग्रामस्तरावर पाच महिलांची निवड करण्यात आली असुन,या प्रशिक्षित महिलांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने पाण्याची तपासणी करण्याची मोहीम २५ एप्रिल २०२४ रोजी एकाच दिवशी राबविण्यात आली आहे.
शासनाच्या ‘जलजीवन मिशन’ प्रकल्पांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमात जनतेस शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे पाणी गुणवत्ता निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आलेले असुन या अभियानात जलसुरक्षक व आरोग्य सेवक यांच्या सहकार्याने ग्राम पाणी पुरवठा सदस्य ,आशा , अंगणवाडी सेविका , बचत गट प्रतिनिधी , ग्रामपंचायत सदस्य यांनी सहभाग घेतला .ग्रामस्थांना जलजन्य आजार होऊ नयेत व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता उच्चप्रतिची राखली जावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला .
या अभियानात गावस्तरावर महिलांनी सहभाग घेऊन पाणी तपासणी मोहिम यशस्वी केल्याबद्दल गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी कौतुक केले .