पत्रकार सुनील तांबे यांची सिंधुदुर्गात व्याख्याने

मालवण,दि.२८ एप्रिल

मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत पत्रकार सुनील तांबे यांची “भारतीय लोकशाही पुढील आव्हाने” या विषयावर बुधवार दि. १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे व गुरुवार दि. २ मे रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. सर्व श्रोत्यांनी या व्याख्यानांना उपस्थित रहावे, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड.देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.