वैभववाडी तालुक्यातील वेंगसर गावातील उ.बा.ठा गटाचे युवासेना भाजप पक्षामध्ये प्रवेश

वैभववाडी तालुक्यातील वेंगसर गावातील उ.बा.ठा गटाचे युवासेना उप जिल्हा प्रमुख अतुल सरवटे व माजी शाखाप्रमुख दिनेश गुरव,गटप्रमुख राहुल घाडी यांचा सह अनेक कार्यकर्त्यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र करून भाजप पक्षामध्ये प्रवेश

वैभववाडी, दि.२८ एप्रिल

वैभववाडी तालुक्यातील युवा शिवसैनिक अतुल सरवटे, दिनेश गुरव, राहुल घाडी,प्रसाद गुरव, प्रशात घाडी,सिध्देश घाडी,शुभम शिंदे, संजय शिंदे, स्वप्निल दबडे,रुतिक घाडी, विजय घाडी, सुनिल पावसकर, गजानन पावसकर, रवींद्र पावसकर, विकास पावसकर, वसंत पावसकर, बाळकृष्ण पावसकर, सुभाष पावसकर, प्रशात पावसकर,शरद अनंत पावसकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील वेंगसर गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे, शक्ती प्रमुख रामदास पावसकर, दिलीप बेळेकर, सरपंच सुगंधा मंचेकर समाधान गुरव, महेश रांबाडे,भाजप पदाधिकारी उपस्थित होते.