वेंगुर्ला,दि.२९ एप्रिल
वजराठ येथील श्री देव गिरेश्वर मंदिर सभामंडपाच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास आले असून या कामाची सांगता दि.१ ते ३ मे या कालावधीत श्री देव गिरेश्वर व श्री देवी सातेरी मंदिरात विविध धार्मिक विधींनी होणार आहे.
दि. १ मे रोजी सकाळी ८ ते २ पर्यंत प्रायश्चित विधी, देवतांना आमंत्रण, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, संभारदान, आचार्य वरण, स्थलप्राकार शुद्धी, संप्रोक्षण विधी, देवता स्थापना, अर्चाशुद्धी, स्नानविधी, अग्निस्थापना, वास्तुयाग, ग्रहयाग, मुख्य देवता हवन, नैवेद्य, आरती, दुपारी २ वा. महाप्रसाद, सायं. ४ ते ८ पर्यंत फुगडी व स्थानिकांची भजने, रात्रौ ८.३० वा. हेमंत देशमुख (पावस-रत्नागिरी) यांचे गायन, रात्रौ ९.३० वा. ह.भ.प.हरिहर नातू (पुणे) यांचे किर्तन, दि.२ मे रोजी सकाळी ७ वा. स्थलप्राकार शुद्धी, आवाहित देवता पूजन, सकाळी ८.४० वा. पालखी प्रदक्षिणा, शिखर कलश स्थापना, सकाळी ९ ते २ पर्यंत नवचंडी विधान, सप्तशती पाठ वाचन, देवता आवाहन पूजन, खेळगडी देवता प्रतिष्ठापना, श्री देव गिरेश्वराकडे लघुरूद्र, नैवेद्य, आरती, दुपारी २ वा. महाप्रसाद, दुपारी ३ वा. कुंकूमार्चन, सायं. ४ ते ८ पर्यंत महिलांसाठी पैठणीचा खेळ (सादरकर्ते-उमेश परब, कुडाळ), कु.स्वरांगी खानोलकर (सावंतवाडी) हिचे भरतनाट्यम, हळदीकुंकू, रात्रौ ९ वा. निळेल वारकरी सांप्रदाय कुडाळ प्रस्तुत ह.भ.प.नितेश रायकर बुवा (कोल्हापूर) यांचे कीर्तन, दि. ३ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत स्थलप्राकार शुद्धी, आवाहित देवता पूजन, सप्तशती पाठ होम, लघुरूद्र स्वाहाकार, बलिदान, पूर्णाहुती, ब्राह्मण संभावना, नैवेद्य, आरती, देवता प्रार्थना, आशिर्वाद ग्रहण, सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ६ वा. सद्गुरू संगीत विद्यालय (सावंतवाडी) प्रस्तुत ‘सप्तसूर झंकारीत बोले‘ हा अभंग, भक्तिगीत व नाट्यगीतांची सुमधूर मैफिल, रात्रौ ८.३० श्री सातेरी उद्दिनाथ पखवाज क्लासेस, तळवडेचे संचालक पखवाज विशारद कु. मेहल कांडरकर यांच्या विद्यार्थी वर्गाचा एकसंघ मृदुंगनाद व भजनरूपी सेवा आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान मानकरी, वजराट, ग्रामसेवा मंडळ-मुंबई व समस्त वजराट ग्रामस्थ यांनी केले आहे.