ठाकरेंच्या जाहीर सभा होण्याआधीच उबाठा गटाला धक्का

बिडवाडी येथील माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र ;आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश

कणकवली दि.२९ एप्रिल(भगवान लोके)

: कणकवली तालुक्यातील बिडवाडी येथील माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे बिडवाडी गावात ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी आमदार नितेश राणे,भाजपा उपाध्यक्ष संदेश सावंत,माजी सभापती दिलीप तळेकर, संदीप सावंत, राजू हिर्लेकर, दत्ता काटे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते