सावंतवाडी दि.१८ जानेवारी
मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दि.२६ जानेवारीच्या उपोषणाला पाठींबा देऊन सहभागी होण्यासाठी आपल्याला नियोजन करायचे आहे, त्यासाठी उद्या शुक्रवार दि.१९ जानेवारी सायंकाळी ५ वाजता आर पी डी हायस्कूल सभागृहात आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील हे२० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अंतरवाली सराटी पासून पद यात्रेस सुरवात करणार आहेत,करंजी घाट,रांजणगाव,कोरेगाव भिमा पुणे शहर,व २५ जानेवारी पनवेल व रात्री वाशी येथे मुक्काम व २६ जानेवारी चेंबूर वरुन पदयात्रेने आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे उपोषणाला सुरुवात होणार आहे,आपण उपोषणात कसे सहभागी व्हायचे यावर विचार विनिमय करण्यासाठी मराठा समाज बांधवांची बैठक उद्या शुक्रवार दि १९ रोजी संध्याकाळी ५ वाजता आर पी डी हायस्कूल सभागृहात आयोजित केली आहे तरी सर्व मराठा समाज बांधवांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले आहे.