वैभववाडी, दि.२९ एप्रिल
वैभववाडी तालुक्यातील वेंगसर व ऐनारी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये युवासेना उपजिल्हा प्रमुख अतुल सरवटे तसेच युवासेना उपविभाग प्रमुख रुपेश गुरव यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेले पक्षप्रवेश उबाठा सेनेला धक्का मानला जात आहे.
सध्या निवडणूक प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत सरशी करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोइंग सुरू झाले आहे. वेंगसर येतील युवासेना उपजिल्हा प्रमुख अतुल सरवटे, दिनेश गुरव, राहुल घाडी,प्रसाद गुरव, प्रशात घाडी,सिध्देश घाडी,शुभम शिंदे, संजय शिंदे, स्वप्निल दबडे,रुतिक घाडी, विजय घाडी, सुनिल पावसकर, गजानन पावसकर, रवींद्र पावसकर, विकास पावसकर, वसंत पावसकर, बाळकृष्ण पावसकर, सुभाष पावसकर, प्रशात पावसकर,शरद अनंत पावसकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील वेंगसर गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
त्याचप्रमाणे ऐनारी गुरववाडी येथील उबाठा गटाचे कार्यकर्ते रुपेश गुरव, विशाल गुरव, अविनाश लोखंडे, नंदकिशोर गुरव, अमित गुरव, प्रसाद गुरव, ज्ञानेश्वर सकपाळ,हर्षल सुतार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ऐनारी गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. नासिर काझी, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, देवानंद पालांडे,आदि भाजप उपस्थित होते.
Home आपलं सिंधुदुर्ग वेंगसर व ऐनारी येथील उबाठा शिवसेना पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे...