आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये केला प्रवेश ; विकासकामांसाठी केला प्रवेश
कणकवली दि.२९ एप्रिल(भगवान लोके)
कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील उपविभाग प्रमुख व माजी सरपंच व्यंकटेश वारंग व दिनेश नेवरेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे सावडाव येथील ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे.
यावेळी आमदार नितेश राणे , भाजपा उपाध्यक्ष संदेश सावंत, दत्ता काटे राजू हिर्लेकर, संदीप सावंत उत्तम वारंग, सिद्धेश लोके अशोक वारंग आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.