कणकवली दि .२९ एप्रिल(भगवान लोके)
कणकवली,मधलीवाडी येथील घरासमोरील अंगणात उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे.याबाबतची तक्रार दुचाकी मालक राजू सावंत यांनी कणकवली पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघड झाली.
राजू सावंत यांनी आपल्या घरासमोरील अंगणात दुचाकी उभी करून ठेवली होती.२८ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातील सर्वजण झोपले.२९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते उठले असता त्यांना दुचाकी उभी करून ठेवलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. शोध घेऊनही दुचाकी न सापडल्याने त्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.