कणकवली दि.३० एप्रिल(भगवान लोके)
गुढीपाडव्यादिवशी शिवतीर्थावर आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. देशपातळीवरही राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याने भाजपाची ताकद वाढली आहे. यानंतर राज ठाकरे जाहीर सभा कधी घेणार याची सर्वांनाच प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा संपली असून राज ठाकरे आपली पहिली प्रचार सभा कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ४ मे रोजी कणकवलीत घेणार आहेत.
राज ठाकरे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आपली पहिली सभा घेणार आहेत. येत्या ४ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात राज ठाकरेंची जाहीर सभा होईल.