सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा रात्रौ आठ वाजता गायनाचा कार्यक्रम
सावंतवाडी,दि.३० एप्रिल
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोंनुर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीचा पुनप्रतिस्थापना सोहळा उदया बुधवार 01मे 2024 रोजी सपन्न होत आहे.
या सोहळ्यानिमित्त सकाळी श्री देवी माऊली देवीचा पुनप्रतिस्थापना
सोहळा , यावेळी विवध धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा रात्रौ आठ वाजता गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी संगीत स्वरांची सुरेल मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भक्तगणांनी व रसिकवर्ग यांनी लाभ घ्यावा असे आव्हान गावकर मंडळी व ग्रामस्थ व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री देवी माऊली देवीचा आज पुनप्रतिस्थापना सोहळा होत आहे. भाविकांच्या मनोकामना या माऊली देवीच्या चरणी पुर्ण होतात. लाखों भाविकांचे श्रद्धास्थान हे दैवत आहे. त्यांचा उदया महत्वाचा पुनप्रतिस्थापना सोहळा होत आहे. यांचा भविकानी लाभ घ्यावा ,,गेले दोन दिवस धार्मिक कार्यक्रम माऊली मंदिरात सुरू आहेत. उदया पुनप्रतिस्थापना देवीचा सोहळा होत आहे.