चेंदवण येथील  राजू पोयरेकर व उमेश नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश

0

कुडाळ,दि.१८ जानेवारी
कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील  राजू पोयरेकर व उमेश नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आल्याची माहीती जिल्हा संघटक रूपेश पावसकर यांनी दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा संघटक रूपेश पावसकर व महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख अरविंद करलकर,महिला आघाडी तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख श्री. आंग्रे, महिला आघाडी प्रमुख कुडाळकर, व जिल्हा संघटक श्री. पावसकर यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले..