कणकवली दि.१ मे(भगवान लोके)

गेल्या दोन महिन्यांपासून माजी आमदार परशुराम उपरकर कुठल्या पक्षात जाणार ? याबाबत उत्सुकता होती. अखेर श्री.उपरकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश ३ मे रोजी होणार असल्याची चर्चा आहे.
माजी आ.परशुराम उपरकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत स्वगृही परतणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या ३ मे रोजी कणकवलीत होणाऱ्या जाहिर सभेवेळी हा प्रवेश होणार असल्याचे
वृत्त आहे.