देवगड ,दि.१ मे
राज्य परिवहन महामंडळ देवगड आगारात १ मे महाराष्ट्र दिन कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आगार व्यवस्थापक निलेश लाड यांच्या हस्ते यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे पत्रकार तथा प्रवासी मित्र दयानंद मांगले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. या सोहळ्यास यास स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर, वाहतूक निरीक्षक गंगाराम गोरे, लवू सरवदे, वाहतूक नियंत्रक विद्याधर सावंत, वरिष्ठ सहाय्यक कुंदा गोलतकर, वाहन परीक्षक दिनकर प्रभूमिराशी तसेच आगारातील चालक, वाहक ,कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते. १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून आगार व्यवस्थापक निलेश लाड, पत्रकार दयानंद मांगले यांनी सर्व कामगार बंधूंना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
