सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने २२ जानेवारी रोजी मोती तलावाच्या काठी १००१ दिवे

सावंतवाडी, दि.१८ जानेवारी
श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने दि .२२ जानेवारी रोजी मोती तलावाच्या काठी १००१ दिवे लावून दीपोत्सव साजरा करणार आहे . अयोध्यातील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून २२ जानेवारीला सायंकाळी ठीक ७ वाजता संपूर्ण मोती तलावाच्या काठी १००१ तेलाचे दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
या दीपोत्सवासाठी शहरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा तसेच अमोल टेंबकर यांच्या ओमकार कला मंच च्या माध्यमातून श्रीराम वाचन मंदिर येथील तलावाच्या काठी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे हि आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमांप्रसंगी शहरवासीयांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे आवाहन सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी केली आहे.