सावंतवाडी दि.१ मे
शिवसेना निवडणूक प्रभारी हे त्या त्या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये काम करुन या संदर्भातील माहिती देणे त्याप्रमाणे त्या विभागातील संघटना मजबुत करणेची सर्व जबाबदारी घेतील व ते आपल्या नियमीत यंत्रणा आहे जसे की विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख या संदर्भातील जे कामकाज चालु आहे त्याची माहिती तालुकाप्रमुख व जिल्हाप्रमुख यांना देतील, असे केसरकर यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले,निवडणूक काळामध्ये पूर्ण निवडणूक यंत्रणा सुसज्ज राहील व ही यंत्रणा पुढे येणा-या निवडणुकीमध्ये कशी सुसज्ज राहील याचा समन्वय हे प्रभारी साधतील. एका निवडणुक प्रभारीकडे दोन जिल्हा परिषद मतदार संघ असतील. आंबोली व माडखोल या जिल्हा परिषद मतदार संघासाठी श्री. दिनेश गावडे तसेच कोलगांव व तळवडे या दोन जिल्हा परिषद मतदार संघासाठी श्री. विद्याधर परब यांना निवडणूक प्रभारी म्हणुन नेमले आहे.
इन्सुली व बांदा या दोन जिल्हा परिषद मतदार संघासाठी श्री. विनायक दळवी, मळेवाड व आरोंदा या दोन जिल्हा परिषद मतदार संघासाठी श्री. एकनाथ नारोजी,माजगांव या जिल्हा परिषद मतदार संघासाठी श्री. गुणाजी गावडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सावंतवाडी तालुक्याचे दोन विभाग करण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले.
यामध्ये आंबोली, माडखोल कोलगांव या जिल्हा परिषद मतदार संघाची जबाबदारी श्री. शशिकांत उर्फ सुभाष गावडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तसेच इन्सुली, तळवडे, बांदा, मळेवाड, आरोंदा, माजगांव या जिल्हा परिषद मतदार संघाची जबाबदारी श्री. गुणाजी गावडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे व हे दोन्ही निवडणूक प्रभारी निवडणूकीच्या संदर्भात तालुका प्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्याशी समन्वय साधतील आवश्यक माहिती पुरवतील व त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहतील अशी माहिती शिवसेना प्रवक्ते, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
