मांगेली येथील दगड खाणीत जिलेटीन स्फोटात जखमी मयत झालेल्या कामगार यांचे फोटो व्हायरल

दोडामार्ग, दि. १ मे 

सोमवारी सायंकाळी मांगेली गावातील एका काळ्या दगड खाणीत जिलेटीन स्फोटात एक कामगार ठार झाला होता तर एक जण जखमी झाला होता या घटनेनंतर हे प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी जखमी मयत कामगार इतर कामगार यांना झोपड्या खाली करून रातोरात हलविण्यात आले होते. अखेर मांगेली खाणीत जिलेटीन स्फोटात जखमी झालेल्या मतत झालेल्या कामगारांचे फोटो आता दोडामार्ग शहरात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे खरा प्रकार समोर आला आहे. या पुरावाच्या आधारे दोडामार्ग पोलिसांना कारवाई करावी लागणार आहे.

दोडामार्ग तालुक्यातील काही दगड खाणीत या अगोदर देखील परप्रांतीय कामगार यांच्या बाबतीत वाईट घटना या खाण मालकांच्या बेजबाबदार पणामुळे घडले आहेत. एका कामगाराचे दोन्ही हात गेले. या कामगाराच्या कुटूंबाला तेव्हा मदत केली नाही. घटना घडल्या की कामगारांना वाऱ्यावर सोडले जाते.
मांगेली कुसगेवाडी दुसगीचा नाला या ठिकाणी झालेल्या जिलेटीन स्फोटात कामगार यांच्या हाताची बोटे तुटली काना कडचा भाग तुटला अशा गंभीर जखमा झाल्या आहेत. हे फोटो मधून दिसून येते.
मांगेली कुसगेवाडी दुसगीचा नाला दगड खाणीत जिलेटीन स्फोटात संतोष चव्हाण हा कामगार मयत झाला तर हिमू चव्हाण
हा जखमी झाला आहे. उपचार सुरू आहेत.
.
मांगेली कुसगेवाडी येथे सुरू असलेल्या दगड खाणीत सोमवारी सायंकाळी पाच वाजता जिलेटीन स्फोटात दोन कामगार जखमी झाले यात एक गंभीर होऊन मरण पावला तर दुसरा जखमी झाला. यावेळी अनेकांनी घटना स्थळी जखमी कामगार यांचे फोटो व्हीडिओ काढले . या घटनेचा गाजावाजा करू न देता मतत जखमी इतर कामगार यांना रातोरात हलविण्यात आले यामुळे संशय बळावला गेला आणि आता जखमी यांचे याच खाणीतील फोटो व्हायरल झाले आहेत.