शिवसेनेच्या अनेक मोहऱ्यानी उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत भाजपात प्रवेश

मालवण,दि. १ मे
ऐन निवडणुकीत भाजपाने मालवण तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्के पे धक्के देण्यास सुरुवात केली आहे गेल्या दोन दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक मोहऱ्यानी उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत भाजपात प्रवेश केला आहे गेल्या दोन दिवसात वायरी भुतनाथचे माजी उपसरपंच श्याम झाड, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, नांदरुख सरपंच भाऊ चव्हाण यांनी शिवसैनिकांसह भाजपात प्रवेश केला

महायुतीचे उमेदवार , केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृवावर विश्वास ठेवत ऐन निवडणुकीत भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या पुढाकाराने ठाकरे सेनेचे शिलेदार भाजपात प्रवेश करू लागले आहेत वायरी भुतनाथ ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा रामेश्वर मच्छिमार सोसायटी माजी उपाध्यक्ष, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शाम झाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. तर वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांसह पाटवाडी, भंडारवाडी, दुखंडेवाडी, घाडीवाडी येथील अनेकांनी भाजपात प्रवेश केला. यात प्रदीप घाडी दशरथ घाडी, तुकाराम घाडी, उल्हास घाडी, विकास परब, विलास घाडी, गोविंद घाडी, विश्वनाथ घाडी, भार्गव सावंत, अर्चना सावंत, विलास सावंत, आत्माराम सावंत, दीपक सावंत, चतुर सावंत, मंगेश मसुरकर, संदीप सावंत, नंदकिशोर सावंत, राजाराम सावंत, गणेश सावंत, प्रभाकर माळपेकर, प्रतिभा माळपेकर, राजेंद्र सावंत, जिपी सावंत, जयवंत परब, प्रतीक सावंत, सदाशिव सावंत, समृद्धी सावंत, महादेव सावंत, रिया सावंत, वैशाली सावंत, संजय सावंत, गोविंद सावंत, सदानंद सावंत, रोहन सावंत, सुरेश सावंत, संजना सावंत, दिपाली सावंत, गणपत सावंत, रितेश लाड, शुभम त्रिंबककर, दिनेश पेडणेकर, गौरव पेडणेकर, सचिन पेडणेकर, आर्यन धुळे, महादेव सावंत, प्रथमेश सावंत, महेंद्र सावंत, ओमकार सावंत, प्रकाश सावंत, विजय सावंत, महेश सावंत, उमेश माळपेकर, गणेश माळपेकर, विनय सावंत, गोविंद दुखंडे, मंगेश दुखंडे, मोहन दुखंडे, दाजी दुखंडे, हर्षद दुखंडे यांसह अनेक ग्रामस्थ यांनी भाजपात प्रवेश केला.

नांदरुख सरपंच भाऊ चव्हाण यांसह सदस्य दशरथ पोखरणकर, नम्रता महादेव चव्हाण, राजश्री सत्यविजय कांबळी, समीक्षा चव्हाण तसेच अनेक ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्या उपस्थितीत नांदरुख कुरले भाटले वाडी येथे आयोजित कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्या सर्वांचे निलेश राणे यांनी भाजप पक्षात स्वागत केले.

विकासाचा दृष्टिकोन ठेऊन भाजपात प्रवेश : सरपंच भाऊ चव्हाण

सरपंच भाऊ चव्हाण म्हणाले, विकासाचा दृष्टिकोन ठेऊन आपण भाजपात प्रवेश करत आहोत. ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास हेच धोरण यापुढे राहील. राणे साहेबांना मोठे मताधिक्य गावातून देऊ. असाही विश्वास सरपंच चव्हाण यांनी व्यक्त केला.

सी वर्ल्ड प्रकल्प नोटिफिकेशन ठाकरे गटाने सत्ताकाळात का रद्द केले नाही ? निलेश राणे

वायंगणी येथे बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी उबाठा शिवसेनेवर हल्लाबोल केला ते म्हणाले, सी वर्ल्ड प्रकल्पला ठाकरे गटाचा विरोध हा केवळ निवडणुकीतील मतांसाठी होता. प्रकल्पला खरा विरोध होता तर ठाकरे गटाने सत्ताकाळात सी वर्ल्ड प्रकल्प नोटिफिकेशन का रद्द केले नाही? सी वर्ल्ड प्रकल्प बाबत ठाकरे गटाने केवळ विरोधाचेच राजकारण केले. मतदार संघात तसेच राज्यातील सर्वच प्रकल्प बाबत जनतेला भडकवून राजकारण करणे. हेच काम ठाकरे गटाचे आहे. असा घणाघाती प्रहार भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे गटावर केला.