कणकवली शहरात तेलीआळी-हर्णेआळी वार्ड मध्ये उ.बा.ठा शिवसेनेची प्रचार फेरी

जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत प्रचार

कणकवली दि.१ मे(भगवान लोके)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली शहरात तेलीआळी-हर्णेआळी वार्ड मध्ये प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. काल भर आठवडा बाजाराच्या दिवशी शिवसेने तर्फे ही प्रचार यंत्रणा राबविण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जयू धुमाळे, रुपेश नार्वेकर, आदित्य सापळे, प्रद्युम मुंज, चेतन मुंज, कौशिक पारकर, उत्तम सुद्रिक, रवी भंडारे, पराग म्हापसेकर, डिचोलकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.