माझ्याविरूद्ध कारवाई होणार आहे, हे मला अगोदरच कळले होते – आ. साळवी

च्याविरूध्द उत्पन्नापेक्षा ११८ टक्के म्हणजे साडेतीन कोटी संपत्ती जास्त असल्याचा आरोप

रत्नागिरी –

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याविरूध्द लाच लुचकत प्रतिबंधक खात्याने केलेल्या कारवाई नंतर त्यांनी सांगितले की, माझ्याविरूध्द कारवाई होणार हे मला अगोदरच कळले होते. या कारवाई संदर्भात पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आ. साळवी यांच्याविरोधात रत्नागिरी एसीबी कार्यालयातून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरूध्द उत्पन्नापेक्षा ११८ टक्के म्हणजे साडेतीन कोटी संपत्ती जास्त असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

गेल्या दीड वर्षांपासून राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. याच मालमत्तांची चौकशी करण्याकरता आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार राजन साळवी यांच्या घरी पुन्हा छापे मारले. त्यांच्या घरी धाड पडल्याचे कळताच संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्या समर्थकांनी धाव घेतली. मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.

१३ जानेवारी रोजीच राजन साळवी रायगड लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात कुटुंबासह चौकशीकरता गेले होते. परंतु, आता यापुढे एसीबीला सहकार्य करणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान, आज पुन्हा एसीबीने त्यांच्या घरी धाड मारली असून सकाळपासून त्यांच्या घरी चौकशी सुरू आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पावलं कुठे पडतात हे मला समजतं. त्यामुळे ते माझ्याकडे येणार आहेत, हे मला माहित होतं. ते रत्नागिरीतील हॉटेलमध्ये उतरले होते. तिथून ते माझ्याकडे येणार असल्याचं मला माझ्या विश्वासूंनी सांगितलं होतं, अशी माहिती राजन साळवी यांनी आज माध्यमांना दिली आहे.