विशाल परब यांनी केला कुंभार समाजातर्फे सत्काराचा स्वीकार!

सावंतवाडी,दि.२ मे
कुंभारटेंम्ब, तुळस येथे कुंभार समाजातर्फे भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी गोरोबा काका समाज मंदिर येथे उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.

स्वातंत्र्य, एकता, समता व सामाजिक न्याय या संविधानिक मूल्यांचे पालन करणे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण देखील सामाजिक हित अबाधित राखण्यासाठी एकोप्याने राहून सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन यावेळी केले.

प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार,आशिष कुंभार, गणेश कुंभार, पांडुरंग कुंभार, तेजस कुंभार, दिनेश कुंभार, सचिन कुंभार, विलास कुंभार, प्रशांत कुंभार, गजानन कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.