रत्नागिरी ,दि.२ मे
सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अखेरच्या टप्प्यात प्रचाराला चुरस पाहायला मिळतेय. उद्या, ३ मे रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तर ४ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवली येथील नगरपंचायत मैदानावर जाहीर प्रचाराच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी कणकवली येथे पाहणी दौरा केला. तर माध्यमांशी बोलताना ज्यांना शिवसेना भेटायला हवी होती त्यांची ४ तारखेची सभा आणि ज्यांची कुवत नसताना मिळालेली शिवसेना त्यांची सभा याचदरम्यान तुम्हाला दोघांची कुवत पाहायला मिळेल. तर ४ तारखेची सभा कोकणाच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा होईल. तर कोकणाला पुढच्या दहा वर्षातील मार्गदर्शनाची सभा होईल असे सांगत, दुसऱ्या ठाकरेंना ऐकायला कोणी येत नाही, तर मी हजार माणसं अशी दाखवीन राज ठाकरेंना ऐकायला येतात अशी खरमरीत टीका मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलीय.