सावंतवाडी,दि.१८ जानेवारी
चराठे पंचशीलनगर पूर्वीचे हरिजनवाडीशर पूर्वीपासून वाडीवर ये-जा करण्यासाठी कच्चा रस्ता असून त्याची नोंद ग्रामपंचायत गाव नमुना २६ मध्ये सन १९७१ पासून आहे. मात्र रस्ता झाला नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. रस्त्याला मंजुरी मिळाली नाही तर २६ जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटली तरी आजही आमच्या वाडीवर वाहने ये जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. वाडीवर ये-जा करण्यासाठी एक पाणंद आहे पण त्यावरुन चारचाकी अथवा मोठी वाहने येऊ शकत नाहीत. सद्यस्थितीत वाडीवर एखादी दुर्घटना घडली अथवा एखादी व्यक्ती अत्यवस्थ आजारी झाल्यास वाडीवर अॅम्बुलन्स अथवा अग्निशमन दलाची गाडी सुध्दा येऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे की
रस्ता पक्का बनविण्यासाठी आम्ही सर्व मंडळींनी वारंवार विनंत्या अर्ज करुनही ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही दखल घेत नाही विद्यमान सरपंच आणि विद्यमान ग्रामसेवक यांचे आडमुठे धोरण मनमानी कारभार आणि अनास्थेमुळे १९७१ पासून रस्ता नोंद असूनही ग्रामपंचायत प्रशासन हा रस्ता पक्का बनविण्यास टाळाटाळ करित आहे. आजही आमच्या वाडीवर चारचाकी वाहने ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे नाईलाजास्तव समस्त मागास समाजावर होणा-या अन्यायाविरोधात २६ जानेवारी , प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत, चराठे कार्यालयासमोर आम्ही एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करित आहोत असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य विश्राम कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश जाधव,सौ मिनाक्षी जाधव यांनी दिला आहे.