डिंगणे देव पुरमारचा 3 रोजी वर्धापनदिन

बांदा,दि.२ मे
माहेर वाशीणीचा देव म्हणून ख्याती असलेल्या डिंगणे येथील श्री देव पुरमार वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक ३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी तीर्थप्रसाद, महाप्रसाद व सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ठीक १० वाजता सिद्धिविनायक दशावतार नाट्यमंडळ पिकुळे यांचा ‘शिव संग्राम’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन डिंगणे ग्रामस्थ व मानकरी यांनी केले आहे.