कणकवलीत श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र या परिसरात संपूर्ण स्वच्छता मोहीम

कणकवली नगरपंचायतमार्फत संपूर्ण स्वच्छता अभियान

कणकवली दि.१८ जानेवारी (भगवान लोके)
बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते ‘’संपूर्ण स्वच्छ्ता (Deep Cleaning) मोहीम’’ राबविण्‍यात आली. त्या धर्तीवर महाराष्‍ट्र शासनाकडून ही स्‍वच्‍छता मोहिम राज्‍यभर विस्तारित करण्‍यात येत आहे. यास अनुसरुन जिल्‍हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे आदेशानूसार कणकवलीत नगरपंचायत च्यावतीने स्वच्छता मोहीम’ राबविण्‍यात आली.

कणकवली नगरपंचायततर्फे दि. १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजलेपासून श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र या परिसरात ‘’संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहीम’’ राबविण्यात आली.
‘संपूर्ण स्वच्छ्ता (Deep Cleaning) मोहीमेअंतर्गत श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र येथे खालीलप्रमाणे कामे करण्‍यात आली.
या परिसरातील उघडयावर टाकण्‍यात आलेला प्‍लॅस्‍टीक कचरा (पॅकेट व बॉटल), काचेच्‍या बॉटल, कागद, कापड, चपला, थर्माकोल इ. प्रकारचा कचरा वर्गीकृत करुन संकलित करण्‍यात आला.
रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असलेले गवत, झाडी ग्रासकटरच्‍या सहाय्याने कटींग करुन साफ करण्‍यात आली.
परिसरातील रस्‍ते झाडून स्वच्‍छ करण्‍यात आले तसेच गटारे साफ करण्‍यात आली
परिसरातील अनधिकृत बॅनर,फलक व जाहिराती हटविण्‍यात आल्या.

या रस्त्यावरील परिसरातील विविध ठिकाणी टाकलेला राडा रोडा (C & D Waste) हटवून रस्‍ता मोकळा करण्‍यात आला.
परिसरातील रस्‍ते धूळ मुक्‍त करण्‍यासाठी नगरपंचायतच्‍या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने रस्‍ते धुण्‍यात आले.या अभियानामध्‍ये कणकवली नगरपंचायतीचे सर्व कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी व सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर ,रोटरी क्लब सदस्य व स्वच्छता दूत दिपक बेलवलकर, सीताराम कुडतरकर (अध्यक्ष,जिल्हा जेष्ठ नागरिक संघ ), जेष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य मनोहर पालयेकर, ज्ञानेश्वर पाताडे, रसिका उपरकर विद्यामंदिर हायस्कूलचे शिक्षक,विद्यार्थी तसेच कणकवली कॉलेजचे शिक्षक आणि NSS विद्यार्थी,जेम्स सामाजिक संघटनाचे सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी देखील या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविला.