वेंगुर्ला,दि. ३ मे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यच्या १३३व्या जयंती निमित्त सिद्धार्थनगर -मठ येथे दि. १२ मे रोजी वयोगट १२ वर्षाखालील व १२ वर्षावरील अशा दोन गटामध्ये रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही गटांतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २ हजार, दीड हजार, एक हजार व ३ हजार, २ हजार व १ हजार रोख व चषक देण्यात येणार आहे. नावनोंदणी अक्षय कर्णिक (९४२१३७८०८२) किवा दत्तप्रसाद मठकर (९४०४११९११८) यांच्याकडे करावी.