वेंगुर्ला,दि. ३ मे
आसोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे शनिवार दि. ४ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे डॉ.आंबेडकर यांचा १३३ वा जयंती कार्यक्रम आयोजित केला आहे.
यानिमित्त सकाळी ९ वा. प्रतिमा पूजन, ध्वजारोहण आणि वंदना, ११ वा. अभिवादन सभा, दुपारी २.३० वा. महिलांसाठी व मुलांसाठी विविध कार्यक्रम, सायं. ५ वा. सामाजिक ऐक्य व सद्भावना मिरवणूक, सायं. ७.३० जाहिर सभा, रात्रौ ९ वा. समुहगायन, भिमगीते गायन, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आावाहन बौद्ध विकास मंडळ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे केले आहे.