अभिनव फाऊंडेशन तर्फे मतदानाबाबत अनोखी जनजागृती

सावंतवाडी दि.३ मे 
अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेच्या सदस्यांनी मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशातच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची मतदान प्रक्रिया मंगळवार दि. ७ मे रोजी सकाळी ७ ते सायं ६ अश्या वेळेत पार पडणार आहे. सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन अभिनव फाउंडेशन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अभिनव फाउंडेशनने अत्यंत मोजक्या शब्दांत मतदारांची जनजागृती करणारे हे फलक लक्षवेधी ठरत आहेत. यासाठी किशोर चिटणीस, राजू केळुसकर, अण्णा म्हापसेकर या सदस्यांनी विशेष प्रयत्न केले असून विधानसभा निवडणुकी आदी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदान जनजागृती करणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.