सुधा आंगणे, संदीप राऊत यांनी स्वीकारला एल अँड टी युनिटचा कार्यभार!

मसुरे, दि.१८ जानेवारी

आंगणेवाडीचे सुपुत्र भारतीय कामगार सेना चिटणीस सुधा आंगणे, आणि चिटणीस संदीप राऊत यांनी एल अॅण्ड टी युनिटचा कार्यभार नुकताच स्वीकारला. यावेळी युनिट कमिटीतर्फे सरचिटणीस यशवंत सावंत, उपाध्यक्ष विनायक नलावडे, खजिनदार कृष्णकांत कदम, सहसचिव अमोल शिळीमकर, सहसचिव प्रवीण मोरे यांनी स्वागत करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.