तिलारी घाटातील रस्त्यावर भाजी वाहतूक करणारा टेम्पो पलटी सुदैवाने कुणी जखमी नाही टोमॅटो भाजीपाला नुकसान

दोडामार्ग, दि. ३ मे 

बेळगाव येथून पणजी येथे टोमॅटो भाजीपाला घेऊन जाणाऱ्या कर्नाटक येथील एका टेम्पोला तिलारी घाटातील
रस्त्यावर शुक्रवारी पलटी होऊन अपघात झाला सुदैवाने या मध्ये कुणी जखमी झाले नाही पण टोमॅटो भाजीपाला याचे नुकसान झाले आहे. प्रथमच घाटात आलेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. तिलारी घाटात अपघाताची मालिका सुरू आहे.
बेळगाव भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाला टोमॅटो घेऊन एक मालवाहतूक करणारा टेम्पो तिलारी घाटातून पणजी गोवा येथे निघाला होता. जवळपास सहा किलोमीटर घाट उतरून खाली आल्यावर एक किलोमीटर अंतरावर वायुवीजन येथील उतारू वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो पलटी झाला. Sank बाजूला पलटी झाला यामुळे घाटातील इतर वाहने यांना अडथळा निर्माण झाला नाही.

टोमॅटो भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पो मध्ये दोघे जण होते. पण यातील कुणालाही किरकोळ दुखापत वगळता काही झाले नाही. टेम्पो मध्ये भरलेले टोमॅटो ट्रे बाहेर फेकले गेले यामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटो भाजीपाला याचे नुकसान झाले. दुपार नंतर अपघात झालेला टेम्पो काढण्याचे काम सुरू होते.
.