कणकवली दि.३ मे(भगवान लोके)
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्याच अनुषंगाने नेत्यांच्या सभा देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. एकाच पटांगणावर दोन्ही ठाकरे बंधू काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिनांक ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी होणार आहे. तर त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता मनसे नेते राज ठाकरे यांची सभा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे. त्यामुळे कणकवलीत पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.