आफ्रिकेत जाऊन प्रचार करा आणि तिथल्या शेतकऱ्यांची मतेही आयात करा आशा आशयाचा बॅनर सर्वांचे लक्ष वेधले

वैभववाडी,दि.३ मे
येथे प्रचार करण्यापेक्षा आफ्रिकेत जाऊन प्रचार करा आणि काजू सोबतच तिथल्या शेतकऱ्यांची मते सुद्धा आयात करा. आशा आशयाचा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वैभववाडी संभाजी चौकात लावलेला बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. या बॅनर वर काजू बी 2019 ला बाजारभाव 160 रु होता. तर 2024 ला 115 रु. बाजार भाव होता. अशी तुलना करीत काजू उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा कधी समजून घेणार असा सवाल करीत, पुढे म्हटले आहे. आफ्रिकन काजू बी वरील आयात कमी करणाऱ्या व मागील पाच वर्षात काजू दराच्या प्रश्नावर एकदाही आवाज न उठवणाऱ्या लोकप्रतिनिधीनो तुम्हाला काजू उत्पादक शेतकऱ्याची गरज नसेल तर आता शेतकऱ्यांनाही तुमची गरज नाही. असा इशारा करीत इथे प्रचार करण्यापेक्षा आफ्रिकेत जाऊन प्रचार करा. आणि काजू सोबत तिथल्या शेतकऱ्याची मते आयात करा. आशा आशयचा बॅनर लावला असून खाली समस्त काजू उत्पादक शेतकरी असे लिहिले आहे.
लोकसभा निवडणूक चार दिवसावर येऊन ठेपली आहे. राजकीय पक्ष आपआपल्या उमेदवारच्या प्रचारात मग्न असताना काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातील नाराजी या बॅनर मधून दिसून येत आहे.