राणे यांनी स्वार्थासाठी किती कोलांड्या उड्या मारल्या हे कोकणवासीयांना चांगलंच माहित अतुल रावराणे

कणकवलीत इंडिया आघाडीची उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा

कणकवली दि.३ मे(भगवान लोके)

विनायक राऊत यांची ही प्रचार सभा नव्हे तर विजयी सभा आहे. ज्या ज्या वेळी उद्धव ठाकरे यांनी या मैदानात सभा घेतल्या. त्यावेळी शिवसेनेचा विजय झाला आहे. राणे यांनी स्वार्थासाठी किती कोलांड्या उड्या मारल्या ,स्वार्थासाठी किती पक्ष बदलले हे कोकणवासीयांना चांगलंच माहित आहे.आजही लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षात शेवटच्या यादीमध्ये धडपड करून कशीतरी स्थान त्यांना मिळवता आलं अशी टीका त्यांनी राणेंवर केली. किरण सामंत सारख्या उद्योजक असलेल्या साध्या व सच्चा भोळ्या मनाच्या तरुणाने राणे यांना उमेदवारीसाठी घाम फोडला.प्रशासनाचा अहवाल आला त्यात राणे कधीच जिंकणार नाही.मोदी आणि योगी यांना माहिती आहे, राणे पडणार आहेत .त्यामुळे कोल्हापुरात ते येऊन गेले पण कोकणात आले नाही .अमित शहानी पहिली तारीख कॅन्सल केली व दुसरी आज परत कशीतरी सभा दिली. त्यांचा सुपुत्र स्टंट बाज आमदाराने गेल्या दहा वर्षात त्यांनी फक्त स्टंटबाजी केली. सगळ्या फसव्या घोषणा या आमदाराने केल्या. राणे यांची राडासंस्कृती गेलेली नाही. त्याला दहशतवादानेच विजय मिळवायचा आहे .आता राणेना सांगतो तुमचा दहशतवाद चालणार नाही. शिवसेनेने तुमचा दहशतवाद संपवला आहे
वैभव नाईक यांनी तुम्हाला धूळ चारली .राणे परिवाराचे पुस्तक आता शिवसेनाच बंद करणार आहे. आपण विजयाची हॅट्रिक साधून राऊत याना तिसऱ्यांदा निवडून देऊया आणि तिसऱ्यांदा पाडून राणेंचे पुस्तक कायमस्वरुपी बंद करुयात.

कणकवली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली आहे.या व्यासपीठावर ठाकरे शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, प्रदीप बोरकर, जान्हवी सावंत, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते , ठाकरे शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, अरुण दुधवडकर, प्रदीप बोरकर, जान्हवी सावंत, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, अतुल रावराणे, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर, भाई गोवेकर, ठाकरे शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, प्रवक्ते अरविंद भोसले, संदीप कदम, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, राष्ट्रवादी शरद पवार गट कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे, राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी मंत्री प्रवीण भोसले, गीतेश राऊत, बबन साळगावकर,बाळा गावडे, नागेश मोरये आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित आहेत.