हिर्लोक गावातील उबाठा शाखाप्रमुख-उपशाखाप्रमुखांचा भाजपात प्रवेश
कुडाळ,दि.४ मे
आमदार वैभव नाईक यांचे खंदे समर्थक समजले जाणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखाप्रमुख चंद्रकांत सावंत शाखाप्रमुख संजय परब आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी गावातील सुभाष सावंत, गणेश परब, पुरुषोत्तम शिर्के, महेश सावंत, बाबू कदम, शाम सावंत, दिव्या सावंत, दिव्या परब यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना शाखाप्रमुख चंद्रकांत सावंत यांनी सांगितले की, हिर्लोक गावात विकासात्मक कामे न झाल्याने, वैभव नाईक यांच्या मर्जीतील ठेकेदारांना विशेष प्राधान्य दिले जात असल्याने तसेच उपसरपंच नरेंद्र राणे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आम्ही माजी खासदार निलेश राणे व भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत प्रवेश करत आहोत. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी आपली विकासात्मक कामे प्राधान्याने सोडवू असे आश्वासन दिले असल्याचे शाखाप्रमुख चंद्रकांत सावंत यांनी सांगितले.